Pimpri Corona Update: रुग्णसंख्येत घट! शहरात आज 72 नवीन रुग्णांची नोंद; 119 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या (Pimpri Corona Update) विविध भागातील 72 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 66 हजार 824 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 279 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 271 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Dengue : डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी

तर, केवळ 8 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 218 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 923 जणांनी कोरोना (Pimpri Corona Update) प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.