Pune : अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय नमुना पाहणी सर्वेक्षण सुरू

एमपीसी न्यूज : अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने राष्ट्रीय नमूना पाहणी सर्वेक्षण सुरू केले (Pune) असून जुलै 2022 ते जून 2023 या कालावधीत माहिती संकलित केली जाणार आहे. माहिती संकलनासाठी निवड केलेल्या जिल्ह्यातील कुटुंबांनी विस्तृत आणि विश्वासार्ह माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी निरुपमा जोशी यांनी केले आहे.

आर्थिक सामाजिक परिमाणांमध्ये देशाच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर तुलना करण्यासाठी माहिती संकलित केली जाणार आहे. शहरी, ग्रामीण लोकसंख्या, रोजगार, शिक्षण, वित्तीय स्थिती, कर्ज यआदी सेवासुविधांबाबत माहिती घेतली जाणार आहे.

Autorickshaw fares : पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

आयुष पद्धतीबाबत सर्वेक्षण केले जाणार असून आयुष पद्धतीचा वापराबाबतही कुटुंबांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे. संकलीत केली जाणारी माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार आहे. या माहितीचा वापर करून शासनाचे कोणतेही विभाग माहिती देणाऱ्या कुटुंबावर कारवाई करू (Pune) शकत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.