Pimpri corona Update : शहरात आज 92 नवीन रुग्णांची नोंद, 82 जणांना डिस्चार्ज, 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 85 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 92 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा चार रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वाकड येथील 80 वर्षीय वृद्ध, चिंचवड येथील 33 वर्षीय पुरुष, चिखलीतील 49 वर्षीय महिला, अहमदनगर येथील 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 726 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 877 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1819 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 764 अशा 2583 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 591 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 229 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 8084 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 605 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.