Pimpri corona Update : शहरात आज 1731 नवीन रुग्णांची नोंद, 1243 कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1694 आणि महापालिका हद्दीबाहेरील 37 अशा 1731 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 276 आणि ‘ब’ कार्यालय हद्दीत 267 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1243 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चार आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात पिंपळेसौदागर येथील 62 वर्षीय पुरुष, चिखलीतील 66 वर्षीय पुरुष, बोपखेलमधील 63 वर्षीय पुरुष, दिघीतील 65 वर्षीय महिला, वाघोलीतील 31 वर्षाचा युवक, येरवड्यातील 59 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 32 हजार 266 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 14 हजार 891 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1961 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 822 अशा 2783 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 2543 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1949 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 22 हजार 50 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 5909 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.