Pimpri Corona Update : शहरात आज 224 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 199 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 199 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 224 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 7 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 230 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 54 हजार 289 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 520 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 195 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 325 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 82 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 630 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 804 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 31 हजार 548 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.