WTC 2021 : न्यूझीलंड पाठोपाठ 15 खेळाडूंचा भारतीय संघ देखील जाहीर

एमपीसी न्यूज – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी न्यूझीलंडने आपला 15 खेळाडूंचा क्रिकेट संघ जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ 15 खेळाडूंचा भारतीय संघ देखील जाहीर करण्यात आला आहे. शुभमन गिल, हनुमा विहारी, ऋद्दीमान सहा, मोहम्मद सिराज, उमेश यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघात 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, प्लेईंग ईल्वेवन अद्याप गुलदस्त्यात आहे.

संघाचे उपकर्णधार पद मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपविण्यात आले आहे. शुभमन गिल, हनुमा विहारी, ऋद्दीमान सहा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी तीन दिवस उरले आहेत. विराट सेना सामन्यासाठी कसून सराव करीत आहे. संघात हिटमॅन रोहीत शर्मा, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, विराट कोहली तसेच, ऋषभ पंत यांच्यावर फलंदाजी ची मदार आहे. तर, इशांत शर्मा, बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी यांच्यावर गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली आहे. अंतिम अकरा खेळाडू कोण असतील हे देखील महत्वाचे आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्यात सोबत झालेल्या कसोटी मालिका खिशात घातल्या आहेत. खेळाडूंचे मनोधैर्य निश्चित उंचावलेले आहे त्यामुळे साऊथम्पटन येथील मैदानावर भरतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘असा’ आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, हनुमा विहारी, ऋद्दीमान सहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.