Pimpri : आयसीसी कंपनीत सिलेंडरचा स्फोट!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज – वल्लभनगर येथील इंडियन कार्ड क्लोनिंग (आयसीसी) कंपनीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. ही घटना आज, सोमवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास घडली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वल्लभनगर बसस्थानकासमोर आयसीसी ही कंपनी आहे. यामध्ये रात्री आठच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे आग लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन दलाचे दोन, प्राधिकरण, रहाटणी, भोसरी उपकेंद्राचे प्रत्येकी एक आणि टाटा टेल्को व बजाज ऑटो या कंपन्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण सात बंब घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत. सिलेंडरचा एक स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.