BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची ‘जनशक्ती’ची मागणी

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत. नियोजित “स्मार्ट सिटी’ म्हणून बोलबाला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर अद्याप पावसाळ्यासाठी तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे तसेच खोदलेले रस्ते पूर्ववत होणे गरजेचे असतानाही शहरातील अनेक भागातील नाल्यांची सफाई अपूर्ण आहे. पावसाळ्या अगोदर नालेसफाई करावी, अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाचे नसीम शेख यांनी आयुक्तांक़डे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

  • दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांचे योग्य नियोजन करण्यात येत. मात्र, हे नियोजन कागदावरच राहते हे पुन्हा एका सिद्ध झाले आहे. नाल्यातील कच-याची योग्य रित्या विल्हेवाट लावली जात नाही.

नाल्यातील कचरा नाल्यात ठेलून आरोग्य बिघडविण्याचे काम केले जात असून नाले सफाई झाली नाही तर, बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.