Pimpri : नालेसफाईचे काम 95 टक्के पूर्ण, आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना (Pimpri) पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य  विभागाने नालेसाफसफाईचे काम 95 टक्के पूर्ण केले आहे. जिथे जेसीबी, पोकलेन जावू शकत नाही अशा नाल्यांची सफाई खेकडा मशिनच्या माध्यनातून केली जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे – मोठे मिळून 148  नाले आहेत. त्यामध्ये ‘अ’ प्रभागात 25, ‘ब’ 15, ‘क’ 29, ‘ड’ 12, ‘ई’ 16, ‘फ’ 19, ‘ग’ 12 आणि ‘ह’ प्रभागात 20 नाले आहेत. महापालिकेच्या वतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते.

उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसाफई केली जाते. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. नाल्यांची साफसाफई मोहिम 24 एप्रिलपासूनच सुरु केली आहे. 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Pune : निगडीतील मॉडर्न हायस्कूल चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील नालेसफाई केली आहे. नाले, स्ट्रॉम वॉटर पुलाखालचे बंद पाईप (सीडी वर्क) या ठिकाणची साफसफाई केली आहे. 1 लाख 1 हजार 920 मीटर नाल्यांची लांबी आहे. तर, रुंदी 739 मीटर आहे. 24 एप्रिल पासून नालेसफाईचे कामकाज हाती घेतले होते. 95 टक्के काम पूर्ण झाले. छोट्या नाल्यांची सफाई नियमितपणे (Pimpri) सुरु असते, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.