Pimpri : सोसायटीधारकांचा एल्गार; बेकायदेशीर काम करणार्‍या बिल्डरांविरोधात आवाज उठविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील बरेच बांधकाम (Pimpri) व्यवसायिक नियमाचे उल्लंघन करत आहेत. नियमबाह्य बेधडक बांधकाम करत आहेत. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन पाठीशी घालत आहे. याबाबत तीव्र स्वरूपाचा आवाज उठविण्याचे एकमत सोसायटीधारकांनी मांडले.

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या (Pimpri) वतीने सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, कायदे विषयक सल्लागार अजित बोराडे, आदीसह परिसरातील 2 हजार सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या सभेमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली. यामध्ये बांधकाम व्यवसायिकाकडून सोसायटी धारकांची होणारी पिळवणूक तसेच बांधकाम व्यवसायिकाकडून प्रलंबित कामाबाबत चर्चा करण्यात आली.

Nigdi : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह तिघांना मारहाण

या सभेमध्ये फेडरेशनचे कायदेविषयक सल्लागार अजित बोराडे यांनी आदर्श उपविधीनुसार सोसायटी कशी चालवायची, याबद्दल मार्गदर्शन केले. सोसायटी विकसकाकडून हस्तांतरण करून घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणती कागदपत्रे घ्यावीत, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कन्व्हेन्स डीड, डीन्म्ड कन्व्हेन्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गणेश वाघमारे यांनी सोसायटीची पूर्ण निवडणूक प्रक्रिया सर्व सभासदांना समजावून सांगितली

सोसायटी फेडरेशनने मांडला कार्याचा आढावा

फेडरेशनने मागील 8 वर्षापासून केलेल्या कार्याचा आढावा अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सादर केला. फेडरेशनने प्रदूषणाच्या विषयावर केलेले काम, मानीव अभी हस्तांतरण अंतर्गत परिसरातील केलेल्या सोसायटीच्या 150 पेक्षा जास्त केलेल्या डीमड कन्व्हेन्स डीड करण्यास सोसायटीस मदत ,सोसायट्यांचा असलेला पाण्याचा प्रश्न, 500 पेक्षा जास्त सोसायटीमध्ये फेडरेशन मार्फत आदर्श उपविधीनुसार सोसायटी संचलित करण्याबाबत केलेले मार्गदर्शन, अनेक सोसायटीमध्ये असलेल्या ओपन पार्किंगचा विषय सोडवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांवर दबाव आणून भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून या बांधकाम व्यवसायिकांना पोडियम पार्किंग ही व्यवस्था करून देण्यात आली.

सोसायटी धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन. कायदेविषयक अडचणी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत नागरिकांचा संवाद कार्यक्रमाचे आयोजन. कर न भरणार्‍यांना सोडून संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या मोहीमेला केलेला विरोध , कोविडच्या काळात सोसायटी सभासदांना केलेली मदत, 50000 पेक्षा जास्त सोसायटी सदस्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सोसायट्यांमधे कोविड लसीकरण शिबिरे घेऊन लसीकरणासाठी मदत,आदीसह विविध कामांचा आढावा मांडला.

पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्येपैकी 75 टक्के लोकसंख्या ही आज सोसायट्यांमध्ये राहते. त्यामुळे सर्व सोसायटीधारकांनी एकत्र येऊन आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्व सोसायट्या आदर्श उपविधीनुसार चालवण्यासाठी फेडरेशन मार्फत भविष्यात काम केले जाईल.

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये सर्व सोसायटी धारकांचे योगदान असेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून प्रशासनावर दबाव गट आणून सर्व काम करून घेण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे
संजीवन सांगळे यांनी सांगितले. सभेमध्ये रवींद्र आंबेकर, मारुती परीट यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक निकम यांनी केले. आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.