Pimpri: पिंपरी-चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनचा मदतीचा हात; महापालिकेस 5 टन तांदुळ, 1 टन तूरडाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन यांनी कोरोनाच्या लढाईसाठी मदत केली आहे. त्यांनी  महानगरपालिकेस 5 टन तांदुळ आणि 1 टन तूरडाळ सुपूर्द केली आहे. हे धान्य भोसरी,  इंद्रायणीनगर येथील अन्न पुरवठा केंद्रात पाठविण्यात आले.

यावेळी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे ,विरोधी पक्षनेते  नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेरे,  पिंपरी-चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बिपीन नाणेकर,  महेश शिंदे,  सी .एन. गायकवाड, अशोक शिरोळे, संभाजी दौडकर, सचिन जाधव, जावेद पटेल, दिपक धवन, हर्षद शेख,कल्याण भोसले, संजय शिंदे, एच.एम.शिंदे, शितल पवार उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे अनेक जण शहरात अडकले आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेने निवारा शेडची निर्मिती केली आहे. महापालिका या नागरिकांना जेवण पुरविते. त्यासाठी विविध सामाजिक संस्था मदत करत आहेत.

पिंपरी-चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन यांनीही कोरोनाच्या लढाईसाठी मदत केली आहे. त्यांनी  महानगरपालिकेस 5 टन तांदुळ आणि 1 टन तूरडाळ सुपूर्द केली आहे. हे धान्य भोसरी, इंद्रायणीनगर येथील अन्न पुरवठा केंद्रात पाठविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.