Pimpri : द्वेष, सुडाच्या राजकारण काळात ‘लोक माझे सांगाती’ मार्गदर्शक – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – राजकीय मतभेद म्हणजे व्यक्तिगत (Pimpri) शत्रुत्वाची जोजवन नव्हे, मनात ग्रह धरून, अढी ठेवून केलेले राजकारण आणि समाजकारण लोकशाहीतल्या संवादाची प्रक्रिया कुंठित करते अशा संवाद प्रक्रियेला शरद पवार यांनी कधीच खेळ बसू दिली नाही. लोकशाही प्रणालीत वैचारिक देवघेव हाच तर समस्यातून मार्ग काढण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणून सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील द्वेष, राग,मत्सर आणि सोडापोटीचे राजकारण थांबवून शास्वत विकास कामासाठी शरद पवार यांनी लिहिलेले लोक माझे सांगाती… हे पुस्तक मार्गदर्शक ठरत आहे, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे हस्ते “लोक माझे सांगाती” यांनी कसोटीच्या क्षणी सामुदायिक शहाणपणाचं दर्शन घडवणाऱ्या प्रत्येक भारतीयास सादर केलेले पद्मविभूषण शरद पवार यांची राजकीय आत्मकथा या 111 प्रति पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले. या अभियानाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन पूर्व संध्येला वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना पहिली प्रत देऊन सुरुवात करण्यात आली.

Chinchwad : पिंपरी-चिंचवडला उभे करण्यात काँग्रेसचा मोठा वाटा – बाळासाहेब थोरात

कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की पवार साहेबांनी धनिरपेक्षता जपत, नेहमीच शिव,फुले, शाहू, डॉ आंबेडकर विचार रुजविण्याचे काम केले आहे. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार, साहित्यिक, उद्योजक,प्राध्यापक अशा सर्वच घटकातील नागरिकांना , मान्यवरांना हे पुस्तक देऊन पवार साहेबांचे विचार व कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांच्यावरती नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांनी ज्या पद्धतीने (Pimpri) टीका सुरू केल्या आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावत असून अशा प्रकारची तुच्छ भाषा वापरणे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. जे लोक कामातून उत्तर देऊ शकत नाहीत असे लोक शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याकडेही राज्य शासनाने लक्ष देण्याची व गुन्हेगारांवर कडक कारवाईची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.