Pimpri : मल्याळी नाट्यकलावंत विधुरा सुधाकरन यांनी एकपात्री नाट्यप्रयोगातून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 

एमपीसी न्यूज – मल्याळी नाट्यकलावंत विधुरा सुधाकरन (Pimpri) यांनी केरलाभवन येथे एकपात्री नाट्यप्रयोगातून राष्ट्रीय एकात्मता,पर्यावरण,महिला सुरक्षिततेचा संदेश दिला. यावेळी चिंचवड मल्याळी समाजमचे (सीएमएस) अध्यक्ष टी.पी. विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, कोषाध्यक्ष पी. अजयकुमार, कलामंदिराचे प्रमुख पी. व्ही भास्करन, जी. करुणाकरन, जॉय जोसेफ, जी.एस. नायर, पी. श्रीनिवासन, फॅन्सी विजयन, प्रवीण पणिकर, इतर समिती सदस्य, सीएमएस सदस्य, लेडीज विंग सदस्य, इतर मल्याळी समाजाचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

Nigdi : शिवतीर्थ मैदान बचावसाठी स्वाक्षरी मोहीम

सुधाकरन हे केरळ ते कन्याकुमारी पर्यंत ड्रामा ऑन व्हिल्स या अंतर्गत दुचाकीवर भारतभ्रमण करीत ठिकठिकाणी आपली कला सादर करीत आहे. सीएमएस च्या वतीने एकपात्री कलावंत विधुरा सुधाकरन यांचा केरलाभवन आकुर्डी येथे सत्कार करण्यात आला. यातून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने कलावंत सुधाकरन हे राष्ट्रीय एकात्मता, याशिवाय पर्यावरण, महिला सुरक्षितेचा संदेश देत आहे. यांच्या या एकपात्री प्रयोगाची नोंद जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये झालेली आहे.

त्यांनी मराठी, मल्याळी, हिंदी, बंगाली, आसामी, पंजाबी, गुजराथी, कन्नड, तेलुगू, ओरिया, कोकणी, काश्मिरी अशा 12 प्रादेशिक भाषेत आपली कला सादर करून तेथील संस्कृतीचे दर्शन घडवले. सुधीर सी. नायर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. पी. अजयकुमार यांनी (Pimpri) आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.