Pimpri: मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याच्या नावात बदल; ‘पर्यावरण व वातावरणीय विभाग’ असे नामकरण

Pimpri: Minister Aditya Thackeray's department name changed; Named as Department of Environment and Climate कामाचा आवाका यापुढे वाढत जाणार असून जनमाणसांमध्येही जागरुकता वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

एमपीसी न्यूज- मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडील पर्यावरण खात्याच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता पर्यावरण व वातावरणीय विभाग असे नामकरण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

पर्यावरण विभागामध्ये वातावरणातील बदलांशी निगडीत कामे पार पाडण्यासाठी स्टेट नॉलेज मॅनेजमेंट सेंटर ऑन क्लायमेट चेंज हा कक्ष मदत करत असून हा विषय पर्यावरण विभागाचा अविभाज्य घटक आहे.

यातील कामाचा आवाका यापुढे वाढत जाणार असून जनमाणसांमध्येही जागरुकता वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने देखील 2011 मध्ये वातावरणातल्या बदलांवर कृती आराखडा अहवाल तयार केला असून केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाने 2014 मध्ये यास मान्यता दिली आहे.


याबाबत मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र मंत्रिमंडळातील पर्यावरण खात्याचे नाव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल मी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो.

यामुळे वातावरणातील बदलांशी निगडित कामे पार पाडण्यासाठी सुद्धा हा विभाग कार्यरत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.