Pimpri : नऊ वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणा-या वृद्धास अटक

एमपीसी न्यूज – नऊ वर्षीय चिमुरडीला जवळ बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करणा-या 68 वर्षीय वृद्धाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 24) दुपारी एक ते शुक्रवारी (दि. 25) दुपारी एकच्या सुमारास वल्लभनगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या 39 वर्षीय आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कासारवाडी येथे राहणा-या एका 68 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वृद्धाने पीडित मुलीला जवळ बोलावले. मुलगी जवळ आल्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने याबाबत घरी सांगितले असता तिच्या आईने तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.