Pimpri: महापालिका मानधनावर शिक्षणतज्ज्ञांची नेमणूक करणार; शिक्षण समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीतर्फे तीन वर्ष कालावधीसाठी शिक्षणतज्ज्ञांची नेमणूक करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये बहुतेक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब घरातून, आर्थिक परिस्थिती नसलेल्या आणि विशेष करून झोपडपट्टीतून, चाळ संस्कृतीतून येत असतात. आपल्या महापालिका शाळांचा दर्जा खाजगी शाळांप्रमाणे अद्यायवत करण्याचा महापालिकेचा प्रयास असणार आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी आणि महापालिका प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण समितीने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.

त्यानुसार शिक्षण समितीमध्ये तीन वर्षांसाठी मानधनावर शिक्षणतज्ज्ञ नेमणूक करण्यात येणार आहेत. त्यांच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अधिक विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविण्यात येतील. त्याचप्रमाणे शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळेल. अशा अनेक योजना यशस्वीरित्या राबल्यिामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची गोडी लागेल आणि महापालिका प्राथमिक शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढून विद्यार्थी पटसंख्येत देखील वाढ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.