Pimpri : अप्रगत मुलांसाठी महापालिकेचा कालबद्ध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्याला सरसकट आठवी पर्यंत उत्तीर्ण करण्याचा (Pimpri) निर्णय बदलण्यात आला आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेची आता वार्षिक परिक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे अप्रगत विद्यार्थ्यांसाठी 30 दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम 4 जुलै पासून सुरू करण्यात आला आहे.

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करता येत नव्हते. पण, आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट 8 वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आला.

पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे.

पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेतू उपक्रमात कालबद्ध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

Talvade : कंपनीतील कामगाराने चोरले 23 लाखांचे साहित्य

यामध्ये दुसरी ते दहावीच्या अप्रगत मुलांसाठी भाषा, इंग्रजी, गणित इयत्ता 1 ली ते 5 वी समाजशास्त्र, विज्ञान 6 वी ते 10 वी अशा विषयांमध्ये अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी ज्यादा तास घेणे, विद्यार्थ्यांकडून (Pimpri) उजळणी करून घेणे, शैक्षणिक साहित्याचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा वापर करून पालकांची मदत घेऊन अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे.

याबाबत माहिती देताना प्रशासन अधिकारी संजय नाईकडे म्हणाले, बालभारतीकडून हस्तपुस्तिका प्राप्त झाल्या आहेत. हस्तपुस्तिकेचा वापर शैक्षणिक साहित्याचा वापर करून अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांना आवाहन करण्यात आले आहे.

30 दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची अंतिम चाचणी घेण्यात येईल. अप्रगत मुलांमध्ये 20 दिवसांत किती बदल झाला आहे. याची तपासणी करण्याच्या अशा सूचना मनपा, अनुदानित शाळांना देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.