Pimpri : महापालिकेचे जिमचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या व्यायाम शाळेतील व्यायामाचे (Pimpri) जुने साहित्य अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील बंद मुलांच्या हॉस्टेलमध्ये ठेवले होते. तेथून अज्ञातांनी 58 हजारांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार सन 2016 ते 9 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला.

 

संदीप सदाशिव विनोदे (वय 50, रा. पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khadki Crime News : मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभागातील व्यायामशाळेचे जुने व नादुरुस्त व्यायामाचे साहित्य सन 2016 मध्ये अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील मुलांच्या हॉस्टेल मधील एका रूममध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी हॉस्टेलच्या गेटचे कुलूप तोडून रूम मधून 58 हजार 740 रुपयांचे साहित्य (Pimpri) चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.