Vadgaon Maval : शास्तीकर माफ करा, अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव शहर भाजपाच्या वतीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रविण निकम यांना (Vadgaon Maval) वडगाव  नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्तीकर माफ व्हावा आणि ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत निवेदन दिले. वडगावचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यानंतर कराच्या बाबतीत बदल झालं आहे. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मिळकत धारकांना वाढीव कर आला असल्याची तक्रार भाजपाने केली आहे.

मार्च 2018 रोजी वडगाव ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे नगर विकास खात्याच्या नियमास अधिन राहून आपण कर आकारणीमध्ये बदल निश्चित करून कर आकारणी केली आहे, परंतु वडगाव शहर मधील सर्व मिळकत धारक यांना आपल्या चुकीच्या कर आकारणी सर्वेक्षणामुळे वाढीव कर लागून आला आहे.

सन 2016 पर्यंत वडगाव शहराकरिता पीएमआरडीच्या नव्हे तर ग्रामपंचायतच्या परवानगीने बांधकामे होत होती.तरी ग्रामपंचायत काळातील करासहित थकीत कर हा मिळकत धारकांना शास्ती कर म्हणून आकारला आहे हे चुकीचे असून, शासनाच्या नवीन जी आर नुसार शास्तीकर माफ व्हावा व वडगाव गावठाण हद्द वाढलेले असून त्या पद्धतीने काही मिळकत धारकांचे बेकायदेशीर असलेले बांधकाम अधिकृत करून घेऊन नियमित करावे,अशी मागणी केली आहे

ही वाढीव चुकीची कर आकारणी दुरुस्त करून मिळकत धारकांना दिलासा द्यावा. यामध्ये आपण वसुलीच्या कारणास्तव अनेक लोकांचे नळ कनेक्शन तोडत आहात हे सर्व बेकायदेशीर असून आपण नागरिकांना मूलभूत गरजेपासून वंचित करत आहात.
लवकरात (Vadgaon Maval) लवकर आपण या बाबतीत खुलासा करून नागरिकांचे होणारे नुकसान टाळावे सदर निवेदनाचा विचार गांभीर्यपूर्वक करून कर आकारणी दुरुस्त करावी आणि शास्ती कर माफ करावा अन्यथा नागरिकांच्या असंतोषाच्या कारणास्तव आम्ही वडगाव शहर भाजपा मोठेजनआंदोलन उभे करून नगरपंचायत कार्यालयावर निदर्शन मोर्चा काढू, व त्या वेळी होणाऱ्या परिणामांस पूर्णतः नगरपंचायत प्रशासन जबाबदार असेल, तरी आपण या संपूर्ण विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Khadki Crime News : मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक

या प्रसंगी निवेदन देताना वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे,संघटन मंत्री किरण भिलारे,गटनेते दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर,रविंद्र म्हाळसकर, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, शरद मोरे, संतोष म्हाळसकर, हरिष दानवे आदिजन उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.