Pune News : रिझर्व्ह बॅंकेचे पुण्यातील दोन बँकांवर निर्बंध

एमपीसी न्यूज-पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाउंट्स को-ऑपरेटिव्ह बँक या दोन (Pune News) सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. यामुळे या बँकांना आता नव्याने कर्ज देता येणार नाही. याचबरोबर ठेवीदारांनाही त्यांच्या खात्यातील ठेवी काढण्यावर मर्यादा आली आहे. हे निर्बंध 10 मार्चपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू झाले आहेत.

 

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय नव्याने कर्ज देता येणार नाही. याचबरोबर नवीन गुंतवणूक, ठेवी स्वीकारणे यावरही बंधन असणार आहे. या बँकांना त्यांच्या कोणत्याही मालमत्ता विकता येणार नाहीत. बँकेच्या पात्र ठेवीदारांसाठी ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे कमाल विमा संरक्षण असणार आहे. रिझर्व्ह बँकेने केलेली ही कारवाई म्हणजे बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. बँकांची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांच्यावरील निर्बंध हटवण्यात येतील.

 

 

Vadgaon Maval : शास्तीकर माफ करा, अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपची मागणी

पुणे सहकारी बँकेच्या खातेदारांना अति तातडीच्या कारणासाठी बचत अथवा चालू खात्यातून 10हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. याचवेळी डिफेन्स अकाउंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना बचत अथवा चालू खात्यातून 30 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. बँका या निर्बंधांसह त्यांचे दैनंदिन कामकाज पार पाडू शकतील. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून आल्यास सहा महिन्यांच्या आधीही हे निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून शिथिल केले जाऊ शकतात.

 

डिफेन्स अकाउंट्स बँकेवर चार वर्षांपूर्वीच आर्थिक निर्बंध घातले होते. या बँकेच्या (Pune News) तीन शाखा असून, तीन हजार 800 खातेदार आहेत. 18 कोटी रुपयांच्या ठेवी असून, 13 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी नऊ ते दहा कोटी रुपयांची थकबाकी आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.