Pimpri : नवीन पोस्ट ऑफीस लवकरच सुरू होणार – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे (Pimpri ) लवकरच नवीन पोस्ट ऑफीस कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिली.

काटे म्हणाले, रहाटणी पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ऑफीस सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे. प्रभाग क्र 28 रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागत 80 हजार ते 1 लाख व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे.

Chinchwad : आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घ्या; एकही जागा न मागता एनडीएला पाठिंबा – बच्चू कडू

या परिसरात खासगी, सरकारी शाळा, महाविद्यालये, तसेच संरक्षण विभागाचे कार्यालय, निवास्थान, सरकारी व खासगी बँकाचे, आयटी पार्कचे कार्यालय आहेत.

परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफीसबाबत कामे करण्यासाठी औंध किंवा पिंपरी-चिंचवडच्या पोस्ट ऑफीस मध्ये जावे लागत असल्याने नागरिकांना याचा त्रास व मोठी गैरसोय होत होती. रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन पोस्ट सुरू व्हावे यासाठी 2012 पासून पत्रव्यवहार केला. नवीन पोस्ट ऑफिससाठी लागणारी (Pimpri ) महापालिकेची पर्यायी जागा सुचविली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.