Pimpri News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व

एमपीसी न्यूज – ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या उपक्रमाअंतर्गत केवळ फी अभावी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक गरीब मुलींचे शैक्षणिक पालकत्व आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले. अभिजात शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित शौनक अभिषेकी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, नगरसेवक जयंत भावे, स्वीकृत नगरसेविका मिताली सावळेकर उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे या गरीब मुलींसाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अनुदान व शैक्षणिक साहित्य एक कर्तव्य म्हणुन देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केतकी कुलकर्णी यांनी केले, मंदार रेडे यांनी प्रास्ताविक मध्ये संघटनेची माहिती दिली. जयश्री घाटे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, राहुल जोशी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.