Pimpri News: अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजाचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आणि सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या कामकाजाचे वाटप केले आहे. डॉ. साळवे यांच्याकडे राष्ट्रीय कार्यक्रमाचे कामकाज, आरसीएमएच, निबंधक, जन्म – मृत्यूविषयी सर्व कामकाज सोपविण्यात आले आहे. तर, डॉ. गोफणे यांच्याकडे सर्व दवाखाने, रुग्णालये याची जबाबदारी दिली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत.

जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे महिन्याभरापूर्वी सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यानंतर अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आणि डॉ. गोफणे यांच्यातील कामकाजाचे वाटप केले आहे.

डॉ. साळवे यांच्याकडे सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचे कामकाज, आरसीएमच, एनयूएचएम,  पीसीपीएनडीटी, आरएनटीसीपी विषयक कामकाज, तारांकित, आतरांकि प्रश्न व इतर विषय हाताळणे,  सोपविण्यात आलेल्या कामकाजच्या बैठकीला उपस्थित राहणे,  अनुषंगाने शासनास पत्रव्यवहार करणे, आवश्यक अशी मागणी केलेली माहिती पुरवणे, निबंधक, जन्म मृत्यू विषयी सर्व कामकाज,  विवाह नोंदणी विषयक कामकाज सोपविण्यात आले आहे.

सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे वायसीएम रुग्णालय वगळता वैद्यकीय मुख्य कार्यालय, पालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने यांचे कामकाज, मध्यवर्ती औषध भांडार व मध्यवर्ती साहित्य भांडार या विभागाचे सद्यस्थितीत चालू असलेले कामकाज सोपविण्यात आले आहे.

खासगी रुग्णालय नोंदणी विषयक व त्या अनुषंगाने इतर सर्व कामकाज, धन्वंतरी स्वास्थ’ योजनेचे संपूर्ण कामकाज, रुग्णलाय, दवाखाने या ठिकाणी  कार्यरत असलेले गट ब, क, ड संवर्गात कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे अधिकार डॉ. गोफणे यांना देण्यात आले आहेत.

सोपविण्यात आलेल्या कामकाजच्या बैठकीला उपस्थित राहणे,  तारांकित, आतरांकि प्रश्न व इतर विषय हाताळणे, कोविड 19 विषयी संपूर्ण कामकाज, विभागप्रमुख म्हणून संपूर्ण कामकाज, कोविड 19 च्या अनुषंगाने तसेच इतरवेळी नियमित कामकाजच्या अनुषंगाने मानधनावरील नेमणुकांचे कामकाजही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आणि सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सोपविण्यात आलेले कामकाज सक्षमपणे करावे. कामकाजाच्या अनुषंगाने काही नव्याने प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करण्याची आवश्यकता असल्यास तसे प्रस्ताव प्रशासन व लेखा विभागाकडे सादर करावेत.

सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.  गोफणे यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने यापूर्वी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना प्रदान केलेले सर्व प्रशासकीय व वित्तिय अधिकार पूर्ण क्षमतेने वापरावेत.

अधिकाऱ्यांनी डॉ. गोफणे यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करायचे असून ते सोपवतील अशी अन्य कामे करायची आहेत. नोडल अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी डॉ. गोफणे यांच्या नियंत्रणखाली व त्यांच्या सूचनेनुसार कोविड 19 संदर्भातील सर्व कामकाज करावे. तर, डॉ. गोफणे यांनी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करायचे आहे. वैद्यकीय विभागाचे नियंत्रित अधिकारी अतिरिक्त आयुक्त पाटील असणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.