Wakad News : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथील राजवाडेनगर, तापकीर मळा चौकाजवळ  दोन तासांपूर्वी जन्मलेले जिवंत स्त्री अर्भक आढळले. ही घटना आज बुधवारी (दि. 28) सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी नितीन सूर्यवंशी यांना बुधवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगामध्ये जीवंत स्त्री अर्भक आढळून आले.

काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नढे,  इरफान शेख, रोहित कदम, आरोग्य निरीक्षक वाटाडे यांनी त्यास पिंपरीतील जिजामाता रूग्णालयात दाखल केले. त्या अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अर्भकाच्या माता-पित्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.