Pimpri News : आत्मनगर सोसायटीतर्फे पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

एमपीसी न्यूज – महाड पासून 35 किमी अंतरावर असणाऱ्या चार गावांचा पुरामुळे रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या गावातील लोकांचे जीवनावश्यक वस्तूंअभावी हाल झाले आहेत. त्यांना आत्मनगर सोसायटी, खराळवाडी यांच्या तर्फे दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच कपडे, टॉवेल, चादरी, औषधे याचे शनिवारी (दि.31) वाटप करण्यात आले.

या वेळी महाडमधील सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रतिक मोरे यांची मोलाची मदत झाली. पोलीस पाटील विजय कडू यांनी मदतीबद्दल आभार मानले. अतिवृष्टीमुळे ‘महाड वारंगी’ रस्ता वाहून गेला आहे. रस्ता तुटल्याने जवळपास चार-पाच गावे वाडीवस्त्याचा संपर्क तुटला आहे. लोकांचे खूप हाल होत आहेत. लाईट नसल्याने ही गावे पूर्णतः अंधारात आहेत. तसेच बस सेवा सुरू नसल्याने बाजारपेठेत यायचे सुद्धा वांदे आहेत. महाड शहरापासून ही गावे जवळपास 35 किमी अंतरावरती आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नाहीयेत.

मदत गोळा करून पूरग्रस्तांना पोहचवण्यासाठी राजेंद्र आठवले, ओमकार नामपूरकर, ॲन्थनी सलढाणा, अमेय कदम, किशोर पुतरण, आनंद तेजवाणी, आकाश प्रतापे, सुमित जगताप, अभिजित तापकीर, तथागत अभंगराव, ऋषी शेट्टी, राजेश हलदीपूर, महेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.