Pimpri News: कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’चा पर्याय आहे बेस्ट; जाणून घ्या फायदे

एमपीसी न्यूज – आजपासून कचऱ्याचे विलगीकरण झाले (Pimpri News) नसेल तर, तो कचरा उचलणार नाही अशी भूमिका पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतली आहे. कच-याचे विलगीकरण ही प्रक्रिया सोपी आहे. कचऱ्याचे विगलीकरण व्यवस्थित केले. तर, समाजाला आणि आपल्याला भरपूर फायदे होतील. त्यामुळे हे फायदे मिळवण्यासाठी काही पर्याय आणि प्रक्रिया आहेत. त्या आपण जाणून घेऊया…

1. विलगीकरण (segregation) – कचऱ्याचे भरपूर प्रकार आहेत. सुका कचरा, ओला कचरा, सॅनिटरी वेस्ट, घातक कचरा (hazardous waste), ई-कचरा (electronic waste), निष्क्रिय कचरा (inert waste). कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे कचऱ्याच्या निमिर्तीच्या ठिकाणी विलगीकरण करणे. मग त्याच्यासाठी कोणकोणत्या बादलांमध्ये कोण कोणता कचरा टाकावा? याची माहिती असावी.

ओला कचरा हा हिरव्या रंगाच्या बादलीमध्ये टाकावा, सुका कचरा निळ्या बादलीमध्ये, सॅनिटरी कचरा हा लाल बादलीमध्ये, ई कचरा हा राखाडी रंगाच्या बादलीमध्ये तर घातक कचरा हा काळ्या रंगाच्या बादलीमध्ये टाकावा. निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण केल्यावर वेगवेगळ्या झालेल्या कचऱ्याचे वेगवेगळे उपयोग आहेत.

आपण जर कुठल्या सोसायटीमध्ये राहत असाल आणि नियमान कचऱ्याचे विलगीकरण जागेवर करत असाल तर कचऱ्याच्या करामध्ये महापालिकेकडून सूट मिळते. तेच नव्हे तर तुम्ही महापालिकेकडे कचरा (Pimpri News) न देता स्वतःसाठी सुद्धा कचऱ्याचे उपयोग करून घेऊ शकता.

Pimpri News : बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटीसाठी ‘पोर्टा केबिन’मध्ये भरणार स्कूल

2. बायोगॅस प्लांट – जर आपण स्वतःच्या वैयक्तिक बंगल्यामध्ये राहत असाल तर कचऱ्याचे विलगीकरण करून बायोगॅससाठी ओला कचरा वापरणे हे आपल्यासाठी फारच फायदेशीर ठरू शकते. बायोगॅसमध्ये ओला कचऱ्याला ऑक्सीजनपासून वेगळे ठेवले जाते. या वायुविनाच्या प्रक्रियेमुळे कचरा हा एक तर खत किंवा शाश्वत ऊर्जेमध्ये त्याचे रूपांतर आपण करू शकतो. ती शाश्वत ऊर्जा आपण घरामध्ये शेगडीला जोडून स्वयंपाक वगैरे करण्यातही वापरू शकतो.

बायोगॅस हे सोसायटीमध्येही होऊ शकते, पण सोसायटीमध्ये लोकसंख्या जास्त असल्याने बायोगॅसचा असा पुरेपूर वापर करता येत नाही. बंगल्यासारख्या घरांमध्ये लोक कमी असल्याने साठलेल्या कचऱ्याचे शाश्वत ऊर्जेमध्ये रूपांतर करून स्वयंपाकात मदत होऊ शकते. बायोगॅस प्लांटमध्ये कचऱ्यामुळे होणारा मिथेन गॅस हा ऊर्जा म्हणून काम करतो.

3. खत निर्मिती – ओल्या कचऱ्याने खत निर्मिती ही चांगली होते. खत निर्माण करून ते आपण आपल्या परिसरातील झाडांना वापरू शकतो. खत विक्री ही आपण करू शकतो. याच्यामुळे ओला कचरा याचा सदुपयोग होतो आणि हा कचरा वापरल्या गेल्यामुळे प्रदूषण कमी होते. ही खत निर्मिती फ्लॅटमध्ये देखील शक्य आहे. अगदी कमी जागेतही ही खत निर्मिती शक्य आहे.

4. रिसायकल व पुनर्वापर – बऱ्याच प्रकाराचा कचरा म्हणजे सुका कचरा, ई-कचरा हे आपण परत वापरू शकतो किंवा रिसायकल करू शकतो. काही व्यवसाय आहेत, जे घराघरातून कचरे उचलतात आणि त्याचे रिसायकल किंवा पुनर्वापर करतात. याच्यामुळे जेव्हा कचऱ्यांवर प्रक्रिया केली जाते, तेव्हा होणारे अपघात टाळू शकतो. व याच्यामुळे होणारे प्रदूषण हेही टाळण्यास मदत होते.

कचऱ्याचे विलगीकरण हे प्रत्येक नागरिकांनी करावे. त्याचे भरपूर फायदे आहेत. हे केल्याने सरकारला जास्त मनुष्यबळ लावावी लागत नाही. या कचऱ्याचे चांगले विलगीकरण करून त्याचे फायदे घेणाऱ्या काही सोसायटी आपल्या परिसरात आहेत. पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी हे याचे चांगले उदाहरण आहे. 2016 पासून रोजलँड रेसिडेन्सी ही कचऱ्याचे विलगीकरण जागेवरच करून त्याचे वेगवेगळे फायदे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना देते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.