Pimpri News: योसेफ नाटिकेत ख्रिस्ती बांधव हरकले; नाताळनिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – ख्रिस्ती समाजातील ‘फेथ ग्रुप’ तरुण (Pimpri News) कलाकारांनी नाताळनिमित्त ‘बायबल’वर आधारित ‘योसेफ’ नाटक सादर केले. नाटकातील नृत्य, गाणी, सादरीकरण पाहून ख्रिस्ती बांधव हरखून गेले.

संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंग मंदिरात हे सांस्कृतिक नाटक सादर करण्यात आले होते. ‘योसेफ’ या देवाच्या सेवकाची कथा नाटिकेतून उलगडली. सुसज्ज रंगमंच उभारण्यात आला होता. योसेफची भूमिका जोशवा शर्मा याने साकारली. मोझेस पारधे, बॉबी सॉरेस, वेन्ड्रिज सॉरेस, कॉलन सॉरेस, ऐस्तर अरनॉल्ड, सूरज पंचारिया, आकाश सेठी, समीर चक्रनारायण, आशिष आरोळे व सहकलाकारांनी अभिनय केला आहे. कार्यक्रमाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

Pimpri News

PCMC: भामा-आसखेड धरणातून चिखलीपर्यंत 28 किमी लांबीची जलवाहिनी टाकणार

सध्या ख्रिसमस फिवर असल्याने ठिकठिकाणी (Pimpri News) सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्त ख्रिस्ती बांधवांनी या नाटकाचा आनंद विना शुल्क लुटला. ‘फेथ ग्रुप’ ही ख्रिस्ती बांधवांची सामाजिक संस्था आहे. संस्थेचे युवा सदस्य नाताळनिमित्त दरवर्षी बायबलमधील एका विषयावर नाटिका सादर करतात. गेली 13 वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. यंदा फेथ ग्रुपच्या कलाकारांनी ‘योसेफ’ या बायबलमधील पात्र नाटिकेसाठी निवडले होते. फेथ ग्रुपचे संस्थापक ब्रदर नोएल व्हॅनहॉल्ट्रन यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बिशप, फादर आणि पास्टर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.