PMC : पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत स्कूल ट्रॅव्हल इम्प्रुमेंट प्लॅन

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत स्कूल ट्रॅव्हल इम्प्रुमेंट प्लॅन अंतर्गत अर्चना कोठारी, चिन्मय नागपूरकर चैताली पाटील यांनी डेक्कन झोनसाठी सादर केलेली डिझाइन एंट्री ही शालेय प्रवास सुधारणा योजना अर्बन डिझाईन स्पर्धेतील तीन पैकी तिसरी विजयी एंट्री आहे. शाळेतील मुलांसाठी रस्ता सुरक्षा सुधारणे आणि शाळांमध्ये सुरक्षित प्रवेश प्रदान करणे हा या स्पर्धेचा हेतू आहे.

चाचणी टप्प्याच्या अंमलबजावणीमध्ये डेक्कन येथील शेलारमामा चौक, प्रभात रस्ता, गरवारे शाळा तसेच सिंबायोसिस शाळा पंडित आगाशे शाळा रस्त्याचा एक भाग निवडण्यात आला; ज्यावर तीन शाळा आहेत. ट्रायल स्ट्रेचमध्ये सुरक्षित पादचारी आणि सायकल ट्रॅक मार्ग तयार करण्यात आला. शाळेच्या गेटवर गोंधळ टाळण्यासाठी स्कूल बस, स्कूल व्हॅन आणि पालकांना सोडण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था तयार करण्यात आली होती. जंक्शनवरील सार्वजनिक जागेवर पुन्हा हक्क मिळवण्यासाठी झेनसार चौक जंक्शनची पुनर्रचना करण्यात आली. झेब्रा क्रॉसिंग आणि 25 किमी/तास पर्यंत वाहनाचा वेग कमी करण्यासाठी वाहतूक शांत करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या.

Pimpri News: योसेफ नाटिकेत ख्रिस्ती बांधव हरकले; नाताळनिमित्त आयोजन

गरवारे प्रशाला, पंडित आगाशे शाळा व सिंबायोसिस शाळेने या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांची सायकल रॅली काढण्यात आली. शाळकरी मुले, स्कूल बस आणि व्हॅन चालकांसाठी तसेच शाळेतील शिक्षकांसाठी वाहतूक सुरक्षेविषयी कार्यशाळा घेण्यात आली. वाहतूक पोलीस RSP विभाग, सेफ किड्स फाउंडेशन व WRI या संस्थानी मुलांसाठी कार्यशाळा घेतले व PMPML यांनी मुलांसाठी मोफत bus ride आयोजित केली.

शाळेतील मुलांनी पदपथाचा जागेत तयार केलेल्या रंगीत खेळाच्या क्षेत्रांचा आनंद लुटला. शाळकरी मुलांनी जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृती करण्यासाठी चित्रे रेखाटली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.