Pune : नाताळ निमित्त 8 वर्षाच्या खालील मुलांना कात्रजच्या प्राणी संग्रहालयात मोफत प्रवेश

एमपीसी न्यूज : नाताळ निमित्त पुणे (Pune) महापालिकेने 8 वर्षाच्या आत मुलांना कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र येथे पुर्णपणे फ्री एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट आज (दि.23) ते 31 डिसेंबर या आठ दिवसांच्या कालवधीसाठी असणार आहे.

या संग्रहालयात मुलांना सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी पाहता येणार आहेत. शाळांना नाताळच्या सुट्ट्या असल्याने पुणे महापालिकेने ही सुट दिली आहे. मात्र यासाठी महापालिकेने काही अटी घातल्या असून यात 8 वर्षा खालील मुलांची उंची 4 फुट 4 इंच पर्यंत असन बंधन कारक आहे. तसेच मुलांना मोफत प्रवेशासाठी PM CAREया अप व संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा फायदा घेत प्राणी संग्रहालयाला भेट द्यावी असे आवाहान पुणे महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.