Pimpri News: पिंपरी चिंचवडमध्ये ‘या’ 61 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील 1 लाख 2 हजार 321 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. महापालिकेने कोरोना लसीकरण केंद्रामध्ये वाढ केली आहे. महापालिकेच्या वतीने 44 ठिकाणी आणि 17 खासगी रुग्णालये अशा 61 ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यान्वित केले आहेत.

याबाबतची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

दुस-या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु झाले आहे. तसेच 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासन नियोजन करत आहेत.

प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे

‘अ’ प्रभाग कार्यालय हद्दीतील नवीन आकुर्डी रुग्णालय, हेडगेवार जलतरण तलाव, मोहननगर येथील इएसआयएस हॉस्पिटल 1 आणि 2, आरटीटीसी सेंटर.

‘ब’ प्रभाग कार्यालय हद्दीतील तालेरा रुग्णालय 1 आणि 1स किवळे दवाखाना, बिजलीनगर दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना, काळेवाडी शाळा, पुनावळे.

‘क’ प्रभाग कार्यालय हद्दीतील जाधववाडीतील साई जीवन प्राथमिक शाळा, इंद्रायणीनगर क्रीडा संकुल, वायसीएम रुग्णालय, मासुळकर कॉलनीतील आय हॉस्पिटल, दिनदयाल शाळा.

ड’ प्रभाग कार्यालय हद्दीतील पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, पिंपळेनिलख दवाखाना, 1 , दवाखाना 2, महापालिका शाळा वाकड, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा वाकड, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, रहाटणी शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे.

‘इ’ प्रभाग कार्यालय हद्दीतील नवीन भोसरी रुग्णालय 1, सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल भोसरी, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, च-होली दवाखाना, नवीन भोसरी रुग्णालय 2.

फ’ प्रभाग कार्यालय हद्दीतील साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय 1, 2, स्केटिंग ग्राऊंड सेक्टर नंबर 21 यमुनानगर, तळवडे समाज मंदिर, प्राथमिक शाळा 92 मोरे वस्ती,

‘ह’ प्रभाग कार्यालय हद्दीतील सांगवी महापालिका शाळा, कासारवाडी दवाखाना आणि ‘ग’ प्रभाग कार्यालय हद्दीतील थेरगावातील यशवंतराव प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा, नवीन जिजामाता रुग्णालय 1, 2 अशा 44 ठिकाणी कोरोनाचे लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत.

शहरातील  17 खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्र

आदित्य होमोपॅथिक हॉस्पिटल, ब्रम्हचैतनव्य हॉस्पिटल, ॲक्रॉड हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, लोकमान्य, ओजस हॉस्पिटल, राजवीर हेल्थ सर्व्हिस, साईनाथ हॉस्पिटल, डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, आयुर्वेद कॉलेज, लाईफलाईन हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल, मकन सर्जिकल मेटरनिटी हॉस्पिटल, वाकड मधील सुर्या मदर ॲन्ड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि लाईफ पॉइंट स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे लसीकरण केले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.