Pimpri News : शहरात धोकादायक पध्दतीने वाहतूक

एमपीसी न्यूज – शहरात अतिशय धोकादयक पध्दतीने टेम्पोमधून लोखंडी पट्टयांची वाहतूक होत आहे. त्यामुळे टेम्पोच्या मागील बाजूस असणार्‍या वाहनांचा गंभिर अपघात होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

अजमेरा ते पिंपरीकडे जाणार्‍या टेम्पोतील लोखंडी पट्टया योग्य पध्दतीने बांधले गेले नसल्याने त्या खालपासून वरपर्यंत आदळत होत्या. वाहनचालक वेगात वाहन चालवित असल्याने टेम्पोच्या मागील बाजूस लोखंडी पट्यांना धरून बसलेल्या व्यक्तिची दमछाक होत होती. टेम्पो मागे जाणारी वाहने आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवित होती.

मोरवाडी चौकातून हे वाहन वाहतूक पोलीसांसमोरून बिनदिक्कत निघून गेले. मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याने याकडे दूर्लक्ष केले. या पट्टया निसटून मागच्या वाहनांवर पडल्या तर अतिशय गंभिर अपघात होऊ शकतो. अशा धोकादायक वाहनांची वाहतूक करताना पांढरे किंवा लाल कापड साहित्यांना बांधणे आवश्यक असते. त्यामुळे मागे असलेल्या वाहनांना वेग कमी करून सुरक्षित ठेवून वाहतूक करता येते.

मात्र या टेम्पो चालकाने लावलेले कापड वाहन चालकांच्या दर्शनी देखील पडत नव्हते. त्यामुळे धोकादायकरित्या होत असलेल्या वाहतूकीमुळे शहरात अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा वाहन चालकांवर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही सुजान वाहन चालकांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.