Pimpri News: भर दिवसा महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – वडापावच्या गाडीवरून वडापाव पार्सल घेऊन निघालेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजता तपोवन मंदिर रोडवरील गणेश मंदिराच्या शेजारी घडली.

कमल मदन गोयल (वय 53, रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमल गोयल तपोवन मंदिर रोडवर गणेश मंदिराच्या शेजारी असेलल्या वडापावच्या गाडीवरून वडापाव पार्सल घेऊन जात होत्या. वडापाव त्यांच्या मोपेड दुचाकीच्या डीक्कीमध्ये ठेवत असताना स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी कमल यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हि-याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.