Pimpri News: अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त 437 नागरिकांची मोफत कोरोना चाचणी

7 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या वाढदिवासानिमित्त मोफत कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

437 नागरिकांनी तपासणी करुन घेतली. त्यामध्ये 7 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ उपचार करणे सोपे झाले आहे.

भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 शाहूनगर येथे मोफत रॅपिड कोरोना टेस्टिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक केशव घोळवे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अमित गोरखे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, भाजप उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे, भाजपा मंडल अध्यक्ष विजय शीनकर यांच्या उपस्थितीत पार पडले.

या शिबिरास नागरिकांचा खूप सांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 437 नागरिकांनी टेस्टिंग केले. त्यापैकी 7 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिकेच्या आकुर्डी रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सेसच्या टीमने चांगली कामगिरी बजावली. शिबिरात डॉ. सुनीता साळवे, डॉ. राहुल साळुंखे, डॉ. दीपक चवधरी, डॉ. रोहित जातकर, डॉ. प्रदीप गायकवाड, डॉ. दीपक पेठे, डॉ. श्वेता जगताप, डॉ. हरीश शेंडे, डॉ. राहुल फरांदे, डॉ. विकास फरांदे, गोरक्षनाथ कसबे यांनी काम पाहिले.

भाजपा पदाधिकारी नंदा करे, दिपाली कारंजकर, अश्विनी तोरकड, स्वाती शहाणे, आशा मेटांगे, वैशाली बनकर, भाजपा प्रभाग अध्यक्ष गणेश कानूरकर, केवल पाटील, संदीप चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.