Pimpri News : महापालिकेतर्फे वसंतदादा पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पद्मभूषण विभूषित वसंतदादा पाटील हे (Pimpri News) थोर स्वातंत्र्यसैनिक, शैक्षणिक क्रांतीचे पुरस्कर्ते, सहकार क्षेत्रातील अग्रणी, राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास, उद्योग विकास साधण्याचे यशस्वी प्रयत्न केले असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भोसले, दत्ता नळावडे, बाळासाहेब कांबळे, अशोक लंगडे, माऊजीभाई सापदिया, चमल चौथानी आदी उपस्थित होते.

Bhosari News : स्वच्छता मोहिमेत 27.28 मेट्रीक टन कचऱ्याचे संकलन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.