Pimpri News : बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास रिक्षा चालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र राज्यात विविध शहरांमध्ये ( Pimpri News ) बेकायदेशीररित्या बाईक टॅक्सी सुरू आहे  सरकारची  परवानगी न घेता मोबाईल एपपद्वारे बुकिंग करून बाईक टॅक्सी  प्रवासी वाहतूक धोकादायक पद्धतीने होते म्हणून न्यायालयाने ते रद्द केले .

राज्य सरकारने परिवहन संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनाचे नियमन करून अग्रीगेटर म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये दुचाकीला परवानगी देण्यासाठी समिती नेमलेली आहे. यातून बाईक टॅक्सी परवानगी सुरू करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत रिक्षा चालकांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,सारथी चालक मालक महासंघ तर्फे आज बैठक घेऊन निषेध करण्यात आला.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, इरफान चौधरी, दिनकर खांडेकर,अशोक पवार,  आदीक बोऱ्हाडे,रामा कांबळे,राजू  व्हणमाने,बालाजी भोसले, गुलाब बागवान, सहदेव व्हणमाने, फरीद शेख आदी उपस्थित होते.

 

Morwadi News : कोर्टात महिला-पुरूष वकीलामध्ये वाद

 

महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षा चालकानी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून बाईक टॅक्सीचा विरोधातील लढा यशस्वी केल्यानंतर राज्य शासनाच्या मनामध्ये वेगळीच भूमिका दिसते. रिक्षा चालकांचे वाटोळे करण्याचा प्रकार आहे. राज्यात दुचाकी संवर्गातील वाहनांना प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परिवहन संवर्गात नोंदणी करून अग्रीगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा देण्यासाठी समिती स्थापन केलेले आहे. यासाठी माजी सनदी  अधिकारी ( Pimpri News ) रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा प्रयत्न असून हे अत्यंत चुकीचे आहे, असे नखाते म्हणाले.

यामुळे रिक्षाचालकावरती मोठी संक्रांत येणार असून ते कमी दरात देत असल्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला बाबतीत मोठा धोका होणार आहे. हा अहवाल  सकारात्मक सादर करून राज्य शासन परवाना देण्याचा  विचारात आहे. काही काळ रिक्षा चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करून, यावर बंदी कायमस्वरूपी ठेवावी अन्यथा शिंदे सरकारच्या विरोधात ( Pimpri News ) महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालक तीव्र आंदोलन करतील  असा इशारा दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.