Pimpri News: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी महापौरांनी साधला संवाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांशी महापौर उषा ढोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना मायदेशी सुखरूप आणणेबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कार्यालयाशी संवाद साधला.

शहरातील आदित्य काची, गायत्री पोरे आणि मृणाल पांडे हे विद्यार्थी युक्रेन मधील युद्धामुळे अडकून पडले आहेत. त्यांचेशी महापौर ढोरे तसेच स्वीकृत नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी संवाद साधून त्यांना धिर दिला आणि भारतीय विद्यार्थी तसेच नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच साक्षी फटांगरे यांची आई कल्पना फटांगरे आणि आरती उणेच्या यांचे वडील प्रकाश उणेच्या यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधला.

महापौर उषा ढोरे यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून शहरातील विद्यार्थ्यांची यादी घेतली. पाच दिवसांपूर्वी महापौर ढोरे यांनी संपर्क साधलेली ऋषी ढमाले ही द्यार्थिनी नुकतीच युक्रेनहून शहरात सुखरूप पोहचली आहे. महापौर ढोरे यांनी ऋषी ढमाले हिची तिच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.