Pimpri News : शिवसेना दिनदर्शिकेचे गटनेत्यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसीन्यूज : मोहननगर -आकुर्डी प्रभागातील शिवसेना नगरसेविका मीनल यादव व विभागप्रमुख विशाल यादव यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेना दिनदर्शिकेचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या हस्ते आज, बुधवारी प्रकाशन करण्यात आले.

या वेळी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव, रोहित खजिनदार, मनोज मोहिते, विक्रम देवगावकर, स्वप्नील येवले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयात या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.