Permit application: रास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरामधील 11 परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील 20 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा जाहीरनामा काल प्रसिद्ध करण्यात आला असून परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.(Permit application)
जाहीरनाम्यातील सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना फॉर्म इत्यादीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच संबंधीत परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

Maharashtra News: राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव”

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज 31 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत करता येणार आहेत.  (Permit application) विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.