Pimpri news: पिंपरी चिंचवडमध्ये आज 246 नवीन रुग्णांची नोंद, 326 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 246 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 326 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 18 आणि महापालिका हद्दीबाहेरील 12 अशा 30 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 50 हजार 399 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 5 हजार 107 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 598 रुग्ण गृहविलगीकरणात असून 2 हजार 509 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 154 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 1186 आहेत. आज दिवसभरात 1 हजार 915 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 622 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.