Pimpri : महापालिकेतील ‘इलेक्शन ड्युटी’वरील कर्मचाऱ्यांना थंब इम्प्रेशनमधून सवलत

एमपीसी न्यूज – निवडणुकीचे कामकाज हे राष्ट्रीय कामकाज असल्याने लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त्या झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना थंब इम्प्रेशनमधून सवलत देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कामासाठी महापालिका कर्मचा-यांना पाठविणे बंधनकारक आहे. लोसकभा निवडणुकीच्या कामकाजाकरिता महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या नियुक्त्या लोकसभा मतदार संघाअंतर्गत केल्या जातात. नियुक्तीचे आदेश महापालिकेकडे पाठविले जातात. संबंधित विभागामार्फतच निवडणूक कामकाजाकरिता अधिकारी, कर्मचा-यांना कार्यमुक्त करण्यात येते. महापालिका अधिकारी, कर्मचा-यांची सेवा लोक प्रतिनिधीत्व अधिनियन 1950 मधील कलम 29 या अधिनियमानुसार निवडणूक कामकाजाकामी अधिग्रहित करण्यात येते.

निवडणुकीचे कामकाज हे राष्ट्रीय कामकाज असल्याने अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेच्या बायोमेट्रीत थम्ब उपस्थिती प्रणातीलून सवलत देण्यात आली आहे. निवडणूक कार्यालयाकडे रुजू झालेल्या दिनांकापासून ही सवलत देण्यात येत आहे. निवडणूक कामकाजातून कार्यमुक्त केल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशनद्वारे उपस्थिती नोंदवणी आणि हजेरी पत्रकावर दैंनदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.