Pimpri : संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने दांडेकर पूल, दत्तवाडी, हनुमान नगर, सावरकर वस्ती, राजेंद्र नगर येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून गृहउपयोगी वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. तरी या भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी इच्छुकांनी संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात पुढील साहित्यांची साहित्त्यांची मदत करावी ०१- ब्लैंकेट, ०१- चादर, यासोबत एकूण २००० किटची आवश्यकता आहे. तसेच यातील किराणा माल साहित्य किटमध्ये १) तांदूळ २ किलो, २) गव्हाचे पीठ २ किलो, ३) तूरडाळ १ किलो, ४) तेल १ लिटर तेल, ५) मीठ १ किलो, ६) प्रत्येकी २००ग्रॅम – तिखट, हळद,जिरा,मोहरी, ७) चहा पावडर १०० ग्रॅम, ८) साखर १ किलो, ९) कोलगेट,ब्रश, साबण, असे असावे.

या साहित्यापैकी आपल्याला जमेल तेवढे किट किंव्हा साहित्य खालील पत्यावर पाठवावे. किंवा एका किटची किंमत ५००/- रु. आहे. त्याची पावती देण्यात येणार आहे, असे संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी डॉ मोहन गायकवाड,( साठे कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर, चिंंचवड, पुणे ३३) किंव्हा मो. नं.९९२२४२६०३१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.