Pimpri : तुला भाई बनायचे आहे का म्हणत एकाला कोयत्याने मारहाण, चार जणांना अटक

एमपीसी न्यूज – तुला भाई बनायचे आहे का म्हणत चार ते पाच जणांच्या (Pimpri) टोळक्याने तरुणाला मारहाण करत कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यावरून पिंपरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हि घटना पिंपरी येथे शुक्रवारी (दि.29) घडली.

यापकऱणी सलमान दिलावर शेख (वय 27 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे्. यावरून पोलिसांनी रोहित वाघमारे (वय 30), शानू बहोत (वय25), मोनू बहोत (वय 25), निहाल टाक (वय 20) या चार जणांना अटक केली असून हे सर्व जण पिंपरी येथे राहतात. तसेच त्यांचा साथीदार सईद खान (वय 20) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

Mahavitaran : बारामती मंडलातील 138 गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र जतिन टाक जुनैद शेख यांच्यासह दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपी कोयता घेऊन आडवे आले. यावेळी रोहित वाघमारे याने फिर्यादीला तुला भाई बनायचे आहे का? म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच जिवे मारण्याची धमकी देत कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला तो (Pimpri) फिर्यादी यांनी चुकवला असता त्यांच्या डोळ्याजवळ जखम झाली. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपींवर खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.