Pimpri : रूढीवाद्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी मुलीच्या लग्नात आईने मागितला पोलीस बंदोबस्त

एमपीसी न्यूज – कंजारभाट समाजातील मुलीच्या लग्नात वधूच्या आईने पोलीस संरक्षण मागितले आहे. याबाबत आईने पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला आहे. समाजातील काही रुढीवादी लोक विवाहात अडथळा आणण्याची शक्यता असल्याने या मंगलप्रसंगाला गालबोट लागण्याची भीती आहे. त्यासाठी पोलीस संरक्षण मागितले असल्याचे आईने दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

हा विवाह कंजारभाट समाजाच्या रूढी परंपरने संपन्न होणार असल्याचे अर्जात म्हटले आहे. मात्र, अनिष्ट परंपरा आम्ही टाळून हा सोहळा करणार आहोत. त्यामुळे समाजातील तरुण-तरुणी आणि त्यांचे सहकारी हे जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी नोंदवून विवाह समारंभात गोंधळ करण्याची शक्यता असल्याचे देखील नमूद आहे.

  • यामुळे विवाह समारंभात पोलीस संरक्षण देऊन विवाह सोहळा शांततेत पार पाडून पोलिसांनी सहकार्य करावे, असे वधूच्या आईने संबंधित अर्जातून केले आहे.

गुरुवारी म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी पिंपरी-चिंचवडमधील एका तरुणीचा विवाह समारंभ होणार आहे. दरम्यान, जानेवारी 2018 मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडलेल्या विवाह समारंभात काही तरुणांनी कंजारभाट समाजातील रूढी परंपरेला विरोध दर्शवणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण पिंपरी पोलीस ठाण्यात पोहचले होते. घटनेनंतर सर्व तरुण-तरुणी एकवटले आणि समाजातील रूढी परंपरेला छेद देत लढा उभा केला होता, यासाठी त्यांनी “Stop The vritual” या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून जनजागृती करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.