Pimpri : येथील लोक चांगले संगीत ऐकणारे – बेगम परवीन सुलताना

एमपीसी न्यूज – मी येथे पंधरा वर्षानंतर आले आहे. येथील लोक चांगले संगीत ऐकणारे आहेत. आपण मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी ऋणी आहे, असे भावपूर्ण उदगार ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांनी काढले.

यंदाचा 21 वा स्वरसागर पुरस्कार बेगम परवीन सुलताना यांना उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, विख्यात गायक महेश काळे, सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सतरावा पुरस्कार असून यापूर्वी अनेक दिग्गज कलाकारांना स्वरसागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानपत्र, रोख पंचवीस हजार, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यंदा स्वरसागर महोत्सवाचे २१ वर्ष असून या कार्यक्रमाचे प्रायोजक फरांदे स्पेसेस असून शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे या महोत्सवाला सहकार्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.