Pimpri: खासदार अमर साबळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – राज्यसभा खासदार अमर साबळे यांचा 56 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना उज्वल आणि आरोग्यदायी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात खासदार साबळेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनावश्यक आणि वायफळ खर्चाला बगल देत सामाजिक भान जपत कार्यकर्त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक माऊली थोरात, केशव घोळवे, अनुसूचित जाती मोर्चाचे सुभाष सरोदे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, वेणू साबळे, प्रकाश जवळकर, कुणाल लांडगे, राधिका बोर्लीकर, गणेश वाळुंजकर, संतोष काळभोर, कोमल काळभोर, कैलास सानप, अरुण पवार, शोभा भराडे, विजय शिनकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • खासदार साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात सामूहिक अभिषेक व सामूहिक आरती करण्यात आली. खासदार साबळेंना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे यासाठी मोरया गोसावीला प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर चिंचवड येथील गुरुकुल आश्रम, कासारवाडी येथील उर्दू शाळा, चिंचवड स्टेशन येथील महात्मा फुले शाळा आणि भोसरी लांडेवाडी येथील शांतीनगर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि फळवाटप करण्यात आले. तसेच कासारवाडी येथील मातृभूमी वाचनालयास 100 पुस्तके भेट देण्यात आली. त्यानंतर चिखली सोनवणे वस्ती येथील दादा महाराज नाटेकर मोरया ट्रस्टच्या वृद्धाश्रमात फळवाटप करण्यात आले. अखेरीस पिंपरीतील गणेश वाळुंजकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी दिलेल्या चारा वाटप आणि गुल्लू आसवानी यांच्या अन्नदान कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.

सर्व सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी सर्वांनी खासदार साबळेंना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने खासदार साबळे हे दिल्ली येथे असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या कन्या वेणू साबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.