Pimpri: पौर्णिमा जाधव यांना लांब उडीत सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत एच. ए. कॉलनी, पिंपरी येथील पौर्णिमा जाधव यांनी लांब उडी प्रकारात 50 वर्षांखालील महिलाच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. याबाबत तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ही स्पर्धा नाशिक येथे नुकतीच पार पडली. जाधव पौर्णिमा हिने 6.20 मीटर अंतर उडी मारत सुवर्णपदक नावावर केले. तसेच, 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत सांघिक कांस्यपदक जिंकले.

त्यांनी मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिहेरी उडीत दुसर्‍या क्रमांक मिळवीत रौप्यपदक जिंकले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.