Pimpri :कृषि, आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेव्दारे अमूलाग्र बदल -डॉ. एम. कार्तिकेयन

एमपीसी न्यूज – कृत्रिम बूद्धीमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिक सुखकर व पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी कृषि, आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरण्याचे जागतिक स्तरावर संशोधन सुरु आहे. या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मार्गदर्शन नॅशनल केमिकल लेबॉरेटरीजचे (एनसीएल) वरिष्ठ संशोधक डॉ. एम. कार्तिकेयन यांनी केले.
.
यावेळी तिजुआना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजिचे अधिष्ठाता डॉ. ऑस्कर कॅस्टिलो, ऑस्ट्रेलियामधील युनिर्व्हसिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ व्यव्सथापक ऋत्विक पुंगलिया, व्हर्लपूल कॉर्पोरेशनचे कृत्रिम बुद्धीमत्ता विभागातील वरिष्ठ अधिकारी बी. प्रशांत, अत्रेय इनोव्हेशनचे डॉ. अनिरूद्ध जोशी,चेन्नई येथील डॉ. एमजीआर संस्थेचे डीन डॉ. एल. रमेश, पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा. डॉ. के. राजेश्वरी, प्रा. डॉ. लिना शर्मा, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलचे डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, डीन डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी कविता तिवारी, अभिजित जाधव, स्नेहल राठी यांचा नाविन्यपूर्ण विषयावरील शोधनिबंध सादर केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे ‘कॉम्प्यूटींग, कम्यूनिकेशन कंट्रोल ॲण्ड ॲटोमेशन’ या विषयावरील ‘आयसीक्‍युब – 2019’ आंतरराष्ट्रीय परिषदेत दुस-या दिवशी ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी-आरोग्य क्षेत्रात वापर’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. कार्तिकेयन बोलत होते.

डॉ. अनिरूद्ध जोशी यांनी ‘पर्सनलाईज्‌ हेल्थ सोल्यूशन्स थ्रू डेटा सायन्स व्हिजन आयुर्वेद’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुर्वेदामध्ये रुग्णाचे अष्टविध परिक्षण केले जाते. यामध्ये वात, पित्त, कफ प्रकृतिचा अभ्यास करून रुग्णांच्या नाडी परिक्षणातून निष्कर्ष काढला जातो. रुग्णांची अशीच माहिती अत्रेय इनोव्हेशनच्या माध्यमातून संकलित करून ‘नाडी तरंगिणी’ या नवीन उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. यातून रुग्णावर उपचार करण्यासाठी खात्रीशीर पर्याय शोधणे शक्य झाले आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये नाडी तरंगिणी उपकरणाचा शेकडो वैद्यांनी वापर करून आतापर्यंत 18 हजारांहून जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत.

या परिषदेचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्वागत प्रा. डॉ. के. राजेश्वरी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. एस. आर. शिर्के यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. लिना शर्मा यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.