Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगला खेलोत्सव

एमपीसी न्यूज –  मैदानी खेळ हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासा ( Pimpri ) इतकेच महत्त्वपूर्ण आहे. खेळामुळे आपली बुद्धी तल्लख ,  शक्तिशाली व निरोगी बनते हा उद्देश समोर ठेवूनच ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मध्ये 22 व  23 रोजी खेलोत्सव साजरा करण्यात आला.

खेलोत्सव मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून  सुरेंद्र शेळके,  शरद कुलकर्णी व डॉ. सलील पाटील  तसेच  विशेष अतिथी म्हणून डॉ. विकास मंडलेंचा,  सुहास लुंकड व लायन्स क्लबचे अध्यक्ष मीनांजली मोहिते व मधुरा बुटाला,  अशोक येवले तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ललित कुमार धोका व डॉ.स्वप्नाली धोका  व मुख्याध्यापिका विद्युत सहारे  उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

Talegaon Dabhade : मंत्रा सिटीत रिक्षा स्टॅन्डची सुरुवात

यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक कलाकृती व आपल्या खेळाचे सादरीकरण केले. क्रिकेट, हॉकी, बॅटमिंटन, फुटबॉल, योगा, अथलेटिक, बास्केटबॉल , स्केटिंग , आर्चरी , कराटे, बॉक्सिंग या खेळांचे प्रदर्शन करून सर्वांची लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले  झिप  लाईन व फायर जमचे थरारक  प्रात्यक्षिक साहसाचे उत्तम प्रमाण होते.  शिवकालीन प्रचलित असलेले लाठीकाठी , पोल मलखांब, रोप मलखांब यासारख्या खेळांचा समावेश होता.

लेझीम पथकाने ढोल ताशाच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले  महत्वाचे क्षण दर्शवले. विविध हाऊस ड्रिल चे प्रात्यक्षिक झाले, मैदानी खेळ,  सांघिक खेळ प्रचंड उत्साहाने विद्यार्थ्यांनी यात सहभाग  घेतला व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पदके, चषक देऊन  गौरव करण्यात आला. तसेच एम.सी.एफ कमांडो यांनी पारंगत केलेल्या विद्यार्थ्यांकडून रायफल शूटिंग , आर्चरी, फायर जम्प यासारख्या खेळांचे प्रात्यक्षिक  करून दाखविले.

यावेळी आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. शाळेचे संस्थापकअध्यक्ष डॉ.ललित कुमार धोका व डॉ.स्वप्नाली धोका व मुख्याध्यापिका  विद्युत सहारे  यांनी उपस्थितांचे आभार ( Pimpri ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.