Talegaon Dabhade : मंत्रा सिटीत रिक्षा स्टॅन्डची सुरुवात

एमपीसी न्यूज – कै. काकासाहेब खळदे नगर मंत्रा सिटी 360 तळेगाव दाभाडे येथे रिक्षा स्टॅन्डची ( Talegaon Dabhade) सुरुवात करण्यात आली. दत्त जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 26) नव्या ऑटो रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले.

प्रसिद्ध उद्योजक संकेत सतीश खळदे यांच्या हस्ते या रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सौरभ सतीश खळदे, उपाध्यक्ष कैलास डोळस, खजिनदार अमोल शिंदे, सल्लागार भूषण भास्कर खळदे, मंत्रा सिटी 360 येथील नागरिक उपस्थित होते.

Punawale : पुनावळे-ताथवडे अंडरपास अवजड वाहनांसाठी बंद

उद्घाटन प्रसंगी बोलताना संकेत खळदे म्हणाले, “हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे खळदे नगर मधील बऱ्याच रिक्षा मालकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून सुरु केला आहे. आजूबाजूच्या इतर सभासदांनाही आपत्कालीन प्रसंगी या रिक्षा स्टॅन्डमुळे बराच फायदा होऊ शकतो. या ठिकाणी सात ते आठ रिक्षा स्टॅन्डवर उभ्या असतील. भविष्यात इथे पीएमपीएल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही खळदे यांनी सांगितले.

रिक्षा स्टॅन्डची सुरुवात केल्या बद्दल खळदे परिवाराचे नागरिकांनी आभार व्यक्त ( Talegaon Dabhade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.