Pimpri: लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Pimpri: Rape on young woman by showing lust for marriage आरोपी शुभमने फिर्यादी तरूणीसोबत मोबाइल वरुन संपर्क साधून हळूहळू जवळीक साधली

एमपीसी न्यूज- फोनवरून संपर्क साधत व हळूहळू जवळीक साधून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना पिंपरी येथे घडली आहे.

शुभम मनोज बागडे (वय 24, रा. भटनागर, पिंपरी) याच्या विरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरूणीने गुरूवारी (दि.9) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम त्याच्या आई-वडिलांसह फिर्यादीच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेला होता. परंतु, फिर्यादीच्या आई-वडिलांनी फिर्यादी तरूणीला शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे तिचे दोन वर्षे लग्न करायचे नाही, असे सांगून लग्नास नकार दिला.

आरोपी शुभमने फिर्यादी तरूणीसोबत मोबाइल वरुन संपर्क साधून हळूहळू जवळीक साधली व आपण दोघे दोन वर्षानंतर लग्न करु असे सांगून तिच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरूणीच्या घरी जाऊन मोबाइल मधील दोघांचे फोटो व चॅटिंग डिलीट करण्यास सांगितले. फिर्यादीने ते डिलीट करण्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादी तरूणीस मारहाण करुन शिवीगाळ करुन तू डिलीट नाही केले तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली.

ही माहिती फिर्यादी तरूणीच्या आई-वडिलांना समजली असता त्यांनी आरोपी शुभमला फिर्यादी तरूणीसोबत लग्न करण्याची विंनती केली असता त्याने लग्नास नकार दिला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.